Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedमोबाईल चोरीला गेला किंवा हरवल्यास फोनमधील डाटा डिलीट करता येणार; या सोप्या...

मोबाईल चोरीला गेला किंवा हरवल्यास फोनमधील डाटा डिलीट करता येणार; या सोप्या टिप्स तुमच्यासाठी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अँप्लिकेशन कंपन्या (application Companies) ‘युजर एक्सपिरिअन्स’ची (user experience) माहिती मिळवण्याच्या नावाखाली तुमच्या घडामोडींवर लक्ष ठेवू शकतात. अनेक अँप्स संर्टफोनवरील घडामोडींवर लक्ष ठेवून फोनमधली काँटॅक्ट लिस्ट (Phone contact list), व्हिडिओ, फोटो आणि इतर महत्वाची माहिती महत्त्वाची कागदपत्रं चोरून त्यांच्या कंपनीला पोहचविता…

- Advertisement -

त्यामूळेच गूगलने आपल्या येणाऱ्या नव्या अँड्राईड फोनमध्ये Google Play Protect नावाचा एक नवीन फीचर समाविष्ट केले आहे. हे फीचर युझर्सला धोक्याची सूचना देणार आहे. तसेच जर तुमचा फोन हरवलाच तर मोबाईलमधील महत्वाचा डाटा कुणाच्या हाती लागू नये म्हणून फोनमधला डाटा तुम्हाला फोनमधील डाटा डिलीटही करता येणार आहे. गुगलने या फिचरला I/O २०१७ डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये सादर केले आहे.

कुठल्या मोबाइलकरीता ?

हे फिचर गूगल मोबाईल सर्विस ११ किंवा त्याच्याहून मोठ्या व्हर्जनच्या अॅन्ड्रॉईड डिव्हाइसवर (android device) काम करेल.

या फिचरमुळे तुमचा फोन ऑटोमॅटिक स्कॅन (Automatic Scan) होईल. तसंच यामुळे मालवेयर्सचीही माहिती मिळू शकेल.

कसे कराल अनेबल

हे फिचर इतर अँप प्रमाणे नाही म्हणून प्लेस्टोअर वर उपलब्ध नाही… याचं एक वेगळं पेज आहे, त्यावर याची सगळी माहिती उपलब्ध आहे. या पेजवर जाण्यासाठी सेटींगमध्ये जाऊन ‘गूगल’वर टॅप करा. तिथे ‘सिक्यूरिटी’ हा ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा. त्यानंतर ‘व्हेरिफाय अँप’वर क्लिक करा. मग या सर्व्हिसला तुम्ही अनेबल किंवा डिसेबल करू शकाल.

मोबाईल हरवल्यानंतर कसा करायचा डाटा डिलीट ?

या फीचरला ‘अनेबल’ केल्यास पुढच्या वेळेस कुठलाही नवीन अँप इन्स्टॉल (Install the mobile application) केल्यावर त्याला स्कॅन करून तूमचा मोबाईल सुरक्षित (Mobile Security) आहे की नाही, तसेच तुमचा मोबाईल हरवला तर तुमच्या मोबाईलचा पूर्ण डाटा डिलीट करण्याचेही ऑप्शन तुम्हाला मिळेल.

त्याकरिता गूगलवर जाऊन अँड्राईड डिव्हाइस मेसेंजरवर (Android device Messenger) जावं. तिथे तुमचे जीमेल अकाउन्ट लॉग इन (Account log in) केल्यावर तुम्हाला तुमच्या डिव्हाइस लोकेशन (device location) माहिती मिळेल. त्यावरून तुम्हाला तुमचा फोन लॉक अथवा मोबाईल डाटा डिलीट (mobile data delete) करता येईल.

लेखक : प्रा य़ोगेश हांडगे (लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

- Advertisment -

ताज्या बातम्या