Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedमनसेचा आता डॉमिनोजकडे मोर्चा

मनसेचा आता डॉमिनोजकडे मोर्चा

मुंबई l Mumbai (प्रतिनिधी)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अमेझॉननंतर आपला मोर्चा पिझ्झा आणि तत्सम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉमिनोजकडे वळवला आहे. डॉमिनोजच्या अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध नसल्याने त्यांनी तसा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे.

डॉमिनोजच्या व्यवस्थापनाने मनसेच्या मागणीची दखल घेत आपल्या अ‍ॅप्लिकेशनवर लवकरच मराठी भाषा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन मनसेला दिले आहे.

- Advertisement -

अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी अलिकडेच मनसेने आंदोलन केले होते. मात्र मनसेच्या या आंदोलेनाविरोधात अ‍ॅमेझॉनने थेट न्यायालयात धाव घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवली होती.

त्यावर आक्रमक झालेल्या मनसेने मुंबई, पुणे आणि औरंगाबादमधील अ‍ॅमेझॉनची कार्यालये आणि गोदामांची तोडफोड केली होती. त्यानंतर अ‍ॅमेझॉनने नरमाईची भूमिका घेत सात दिवसात आपल्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते.

आता मनसेने डॉमिनोजकडेही मराठी भाषेतील अ‍ॅप सुरू करण्यासाठी आग्रह धरला आहे. त्यानंतर डॉमिनोजने राज ठाकरे आणि पत्र देणारे मनसे उपाध्यक्ष मुनाफ ठाकूर यांना पत्र देऊन आपण मराठीत अ‍ॅप्लिकेशन सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.

त्यामुळे अ‍ॅमेझॉन, स्विगी, झोमॅटो नंतर आता डोमिनोजच्या जुबिलियन्ट फूड वर्क कंपनीनेदेखील आपल्या अ‍ॅपमध्ये मराठीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या