'गनीमी कावा' करत मनसेने फोडली दहीहंडी

पोलिसांशी झटापटीत हातातच फोडली हंडी
'गनीमी कावा' करत मनसेने फोडली दहीहंडी

औरंगाबाद : Aurangabad

सरकारचे बंदी आदेश restraining order असतानाही महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने Maharashtra Navnirman Sena टीव्ही सेंटर येथे दहीहंडी Yogurt pot फोडली. या कार्यक्रमाला रोखण्यासाठी परिसरात मोठा पोलिस फौजफाटा Police force लावण्यात आला होता. मात्र, गनिमी कावा करत मनसैनिक पोहचले अन् पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत हातातच हंडी फोडली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकाराने दहीहंडी उत्सवावर बंदी घातली आहे. मात्र, हा आदेश हिंदू विरोध असल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजी महाराज चौकात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला. मात्र, दाशरथे नागेश्वरवाडीहून दहीहंडीला जाण्यासाठी निघाले असता पोलिसांनी समर्थनगरात त्यांना ताब्यात घेतले.

दाशरथे रस्त्यातच पोलिसांच्या ताब्यात


चौैकात येणाऱ्या चारही रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त होता. त्यातच दाशरथे यांना ताब्यात घेतल्याची माहिती समजताच मनसैनिक मुख्य रस्ता सोडून गटागटाने टीव्ही सेंटरला पोहचले. त्यांनी सोबत बांबूला हंडी बांधून आणली होती. चौैकात पोलिसांनी हंडी जप्त करण्याचा प्रयत्न केला. झटापटीत दीपक पवार यांनी हातातच हंडी फोडली. तर हिंदूद्वेशी सरकारचा धिक्कार असो, हिंदू सणांसाठी फक्त मनसे अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी १५-२० जणांना ताब्यात घेवून एन-७ पोलिस ठाण्यात आणले.

यांचा होता पुढाकार


मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे आणि शहराध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी यांच्यासह नामदेव बेंद्रे, संदीप कुलकर्णी,चंदू नवपुते, गणेश साळुंके, दिपक पवार, अविनाश पोफळे, युवराज गवई, संतोष कुटे, नीरज बरेज्या, विशाल वीराळे, रमेश पुरी, आशिष सुरडकर, सोमु पाटिल, सुरज बोकारे, ऋषभ रगडे, किरण गवई, अमोल विधाते, सागर भारती, नागेश मोटे, चिन्मय कुलकर्णी, प्रकाश कसारे ,अमर विधाते, शुभम पवार आदी.

नाकावर टिच्चून दहीहंडी फोडली मनसैनिकांनी सरकारच्या नाकावर टिच्चून दहीहंडी फोडली आहे. पोलिसांनी अटक केली असली तरी त्यास घाबरत नाही. वाटेल तेवढ्या केसेस अंगावर घेवून. येथून पुढेही सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी जे काही करावे लागेल ते करू.
-सुहास दाशरथे, जिल्हाध्यक्ष, मनसे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com