औरंगाबादला बसवणार 'सी बँड डॉपलर रडार सिस्टीम'!

खान्देशलाही होणार फायदा 
औरंगाबादला बसवणार 'सी बँड डॉपलर रडार सिस्टीम'!

औरंगाबाद - aurangabad

औरंगाबाद येथे सी बँड डॉपलर रडार बसविण्यास संदर्भात केंद्र सरकारच्या पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाने (Ministry of Earth and Science) परवानगी दिली असून खुलताबाद (Khultabad) तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हैसमाळ येथे हे रडार बसविले जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Minister of State Dr. Bhagwat Karad) यांनी दिली आहे. तर याचा मोठा फायदा मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे.

तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्याशी चर्चा करून सी बँड डॉपलर रडार संदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आग्रही मागणी केली होती. या रडारच्या माध्यमातून हवामाना बद्दलची अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासात हा निर्णय मैलाचा ठरणार आहे. तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील भूभागातील हवामानाचा अचूक अंदाज घेणे सोपे जाईल ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची डॉपलर रडार यापूर्वी केवळ नागपूर, गोवा, मुंबई, सोलापूर या ठिकाणीच उपलब्ध आहे.

भारतीय हवामान खाते आणि विज्ञान मंत्रालय यांच्या माध्यमातून म्हैसमाळ येथे सी बँड रडार बसविण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासंदर्भात अत्यंत महत्त्वाची भूमिका सी बँड डॉपलर रडार निभावणार आहे. किमान तीनशे ते चारशे किलोमीटरचा भूभाग किंवा परिघ या रडारच्या नियंत्रणात येणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पंधरा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com