केंद्र सरकारच्या सुचनेनंतर शाळा सुरू करणार
अन्य

केंद्र सरकारच्या सुचनेनंतर शाळा सुरू करणार

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षे वाया जावून देणार नाही

Dnyanesh Dudhade

Dnyanesh Dudhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनामुळे राज्यात शाळा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. मात्र, यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे.

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पाठय पुस्तकांचे शंभर टक्के वाटप करण्यात आले आहे. राज्यातील काही शिक्षकांनी अतिशय सुंदर व प्रेरणादायी उपक्रम राबवून मुलांना ऑनलाईन शिकवण्याचे कार्य सुरू केले, असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली .

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड औरंगाबादहून मुंबईकडे जात असताना रविवारी नगरच्या शासकीय विश्रामगृहावर काही काळ थांबल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या की, 15 जूनला शैक्षणिक वर्ष सुरू होत असले तरी यंदा करोनामुळे प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यासारखी स्थिती नाही. यामुळे अद्याप शाळा बंदच आहेत.

शाळा सुरू करण्याबाबत जागतिकपातळीवर चर्चा सुरू आहे. अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर तेथे मुलांना करोनाचा संसर्ग. यामुळे केंद्र सरकारने 31 ऑगस्टनंतर परिस्थितीनूसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता केंद्र सरकारच्या सूचना आल्याशिवाय राज्यात शाळा सुरू होणार नाहीत. मात्र, यात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन ऑनलाईन शिक्षणसोबतच टिव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून अभ्यास करून घेतला जात आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात बैठक घेतली असली तरी हे धोरण राबविण्याबाबत राज्यात काही तांत्रीक अडचणी आहेत. त्यावर मात करावी लागणार असून दरवेळी नविन आयोग नविन संस्था स्थापन करण्याऐवजी आहे, त्या आयोगांमधील दोष दुर करून त्यांना बळकटी देण्याचे राज्याचे धोरण आहे.

मुलांच्या शालेय ‘फी’ बाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे त्यावर बोलणे उचित ठरणार नाही आवश्यक वाटल्यास राज्य सरकार आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडेल. यावेळी जि.प. च्या अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, काँग्रेंसचे प्रभारी शहराध्यक्ष किरण काळे, दिप चव्हाण आदी यावेळी उपस्थीत होते.

जुन्या पेशनचा निर्णय समितीच घेणार

राज्यसरकारने नोव्हेंबंर 2005 पुर्वीच्या शिक्षकांना 10 जुलैच्या आदेशाने जुनी पेंशन नाकारली आहे. याबाबत नगरमधील शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी शिक्षण मंत्री गायकवाड यांना निवेदन देऊन 10 जुलैचा आदेश रद्द करून जुनी पेशंन सुरू करण्याबाबत निवेदन दिले. त्यावर गायकवाड म्हणाल्या, याबाबत विधान परिषदेच्या काही सदस्यांची समिती नेमली असुन हि समिती याबाबत निर्णय घेणार आहे. जुन्या पेंशन कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांची निवड योग्य !

राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांचे काम मी जवळून पाहिले आहे. ते अतिशय सक्षमपणे काम करत असून यामुळे त्यांची पद्म पुरस्कार शिफरास समितीच्या अध्यक्षपदी झालेली निवड योग्य आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली. आदित्य हे युवा असून अनुभवाने कमी असेल, त्यांच्यामध्ये काम करण्याची जिद्द महत्त्वाची आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाबाबत गायकवाड यांना विचारले असता, त्या म्हणाल्या खरंतर मला शिक्षणाबाबत प्रश्‍न विचारायला हवे होते, पण बोलायचे झाल्यास मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँड पोलिसांशी होते असून याच मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी याचा तपास चालू आहे, लवकरच सत्यता बाहेर येईल, अशा विश्‍वास मंत्री गायकवाड यांनी व्यक्त केला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com