पुढचा मुख्यमंत्री या समाजाचाच होईल-रामदास आठवले

पुढचा मुख्यमंत्री या समाजाचाच होईल-रामदास आठवले

औरंगाबाद - aurangabad

ब्राम्हण समाज अत्यंत हुशार आणि कष्टाळू आहे, मेहनतीच्या जोरावर तो सरकारी खात्यात मोठ्या पदांवर पोहचला. मात्र, या समाजाची आज वाईट अवस्था आहे. यामुुळेच ब्राम्हण समाजाच्या उत्नाथानासाठी त्यांना (Reservations) आरक्षण मिळणे गरजेचे आहे. यासाठी पंतप्रधान मोदींकडे पाठपुरावा करणार असल्याचे मत रिपाई नेते केंद्रिय मंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी व्यक्त केले. राज्यात पुढचा (cm) मुख्यमंत्री ब्राम्हण समाजाचाच होईल, असा दावा करत त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे संकेत दिले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (Republican Party of India) वतीने नुकताच आठवले यांचा शहरातील कुंवारफल्ली येथील पावन गणेश मंदीरात सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आठवले म्हणाले, ब्राम्हण समाजाने केलेला हा सत्कार खास आहे. रिपाईच्या ब्राह्मण आघाडीला राज्यभरात प्रतिसाद मिळत आहे. अत्यंत हलाखीत जगणाऱ्या समाजाला आता आरक्षणाची गरज आहे. मी नेहमीच तुमच्या आरक्षणासाठी आवाज उठवत आलो आहे. ब्राम्हणांच्या आरक्षणासह समाजाचे विविध प्रलंबित प्रश्न (Prime Minister Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढचा मुख्यमंत्री ब्राम्हणच!

मागच्या पिढीने दलित समाजावर जे अत्याचार केले, ते आम्ही विसरलो आहे. आता हा समज अधिक परिपक्व झाला आहे. आता ब्राम्हण आणि दलित समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. तो दिवस दूर नाही. ब्राह्मण-ललित नक्कीच एकत्र येतील. आम्ही दोघे भाऊ-भाऊ, एकत्र बसून खाऊ असा नाराही त्यांनी दिला. उत्तरप्रदेशात ब्राम्हणांची संख्या १४ टक्के आहे. तेथे योगी आदित्य हेच सत्ता राखण्यात यश मिळवतील. तर राज्यात पुढचा मुख्यमंत्री ब्राम्हण समाजालाच असेल असा दावा त्यांनी केला.

सुरूवातीला रिपाईच्या ब्राह्मण आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत पिंपळे, राजेंद्र पिंपळे, चंद्रकांत महाराज पिंपळे यांनी आठवले यांचा सत्कार केला. याप्रसंगी शहराध्यक्ष संजय ठोकळ, रवी चांदणे, कमलेश चांदणे, सुरेश टाक, अथर्व पिंपळे , बाळू रोजेकर, किशोर चव्हाण, राधाकृष्ण गायकवाड, किशोर तुळशीबागवाले, रोषण पिपाडा, प्यारेलाल जैस्वाल, सुनील अजमेरा, सुनील चौधरी, किशोर भाटी, हार्दिक गुरव आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com