'ज्यांना घरातून काढले त्यांच्याविषयी मी काय बोलू'

अकबरुद्दीन यांनी डिवचले
'ज्यांना घरातून काढले त्यांच्याविषयी मी काय बोलू'

औरंगाबाद - aurangabad

(mim) एमआयएमचे नेते आ. अकबरुद्दीन औवेसी (MLA Akbaruddin Owaisi) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर नाव न घेता खोचक शब्दांत टीका केली. राज ठाकरे मशिदींबरील भोंग्यांच्या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. याच पार्श्वभूमीवर आ.औवेसींनी राज ठाकरेंवर टीका केली. त्यांच्या या टीकेवर आता (mns) मनसेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आ.अकबरुद्दीन ओवेसी यांची गुरुवारी हिमायत बाग परिसरातील मैदानावर जाहीर सभा झाली. यावेळी ते म्हणाले की, जे पण भुंकतात ते भुंकू द्या. कुत्र्यांचे काम भुंकण्याचेच आहे. वाघांचं काम शांतपणे चालत जाणं आहे. त्यांना बस भुंकू द्या. काहीच गरज नाही उत्तर द्यायची. वेळ आणि परिस्थीला समजा. त्यांच्या जाळ्यात अडकायचं नाही. ते जाळं गुंफत आहेत. ते तुम्हाला जाळ्यात फसवू इच्छित आहेत. तुम्ही फसू नका, असा घणाघात आ. अकबरुद्दीन ओवेसी यांनी केला.

मी कुणाला उत्तर द्यायला आलेलो नाही. मी कुणालाही वाईट बोलणार नाही. मी बोलावं इतकं समोरच्याची औकात नाही. ज्यांना घरातून काढले त्याच्यावर काय बोलायचे? मी वेळ निश्चित करीन त्याचवेळी बोलेन. देशात द्वेष पसरवला जातोय. पण मी प्रेम पासरवतो आहे. कुणाला घाबरण्याची गरज नाही. ज्याला कुणाला वाटेत असेल आम्ही घाबरू मात्र ऐकून घ्या, आम्ही घाबरणार नाही. इस्लाम आधी नाही संपला आता कोण संपवणार, असा सवाल करत अकबरुद्दीन यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Related Stories

No stories found.