मेफेड्रॉन ड्रग्ज पॅडलर जेरबंद ; एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत

मेफेड्रॉन ड्रग्ज पॅडलर जेरबंद ; एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत

औरंगाबाद - aurangabad

नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या मॅफेड्रॉन (Mephedrone) (एम.डी. ड्रग्ज) या इूग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या उच्चशिक्षीत संगणक अभियंत्याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून जेरबंद केले. युनूस खान हाफिज खान (वय २६, रा.आसेफिया कॉलनी, प्रॉमिक बुक स्टोअर जवळ) असे मॅफेड्रॉन ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या अभियंत्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ९५ हजार ६७५ रूपये किंमतीचे १८.३ मॅफेड्रॉन ड्रग्ज हस्तगत केले.

बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिस्मिल्ला कॉलनीत असलेल्या गुलशन किराणा दुकानाजवळ युनूस खान हाफिज खान हा नशेसाठी वापरण्यात येणार्‍या मॅफेड्रॉन ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त विशाल दुमे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक हरेश्वर घुगे, सहाय्यक फौजदार नसीम खान, पोलिस अंमलदार महेश उगले, धर्मराज गायकवाड, विशाल सोनवणे, सुरेश भिसे, महिला पोलिस अंमलदार प्राजक्ता वाघमारे, दत्ता दुभळकर आदींच्या पथकाने बिस्मिल्ला कॉलनी येथे सापळा रचून युनूस खान हाफिज खान याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ९५ हजार ६७५ रुपये किंमतीचे १८.३ ग्रॅम मॅफेड्रोन ड्रग्ज (एम.डी.ड्रग्ज) मिळून आले. तसेच सदरचे ड्रग्ज त्याने नालासोपारा, मुंबई येथील फिलिप नावाच्या व्यक्तीकडून आणले असल्याची कबुली दिली. याप्रकरणी सहाय्यक फौजदार नसीम खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून युनूस खान हाफिज खान याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com