Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदहा कोटींचा बाळासाहेबांचा पुतळा!

दहा कोटींचा बाळासाहेबांचा पुतळा!

औरंगाबाद – aurangabad

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचे भव्य स्मारक व स्मृतिवनाचे काम सिडकोतील प्रियदर्शिनी उद्यानात (Priyadarshini Udyan) १७ एकर जागेवर होत आहे.

- Advertisement -

येथे पूर्णाकृती पुतळा व गॅलरीतील विविध प्रदर्शनी कामे करण्यासाठी ९.७० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातून पूर्णाकृती पुतळा तयार करण्यासह विविध कामांसाठी मनपाकडून १ जुलै रोजी निविदा प्रसिद्ध झाली आहे, अशी माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली.

राज्य शासनाकडून या कामासाठी २५.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु, पूर्णाकृती पुतळा व इतर कामांसाठी निधी कमी पडत असल्याने पुन्हा ९.७० कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली. दरम्यान, पुतळा जीआरएसमध्ये तयार करणे तसेच आर्ट गॅलरी, साउंड सिस्टिम, चित्रफीत, इंटेरिअर सुशोभीकरण, लाइट सिस्टिम यासाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या