वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना 'डेडबॉडी' मिळेना!

कोरोनाचा परिणाम
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना 'डेडबॉडी' मिळेना!

औरंगाबाद - Aurangabad

सलग दोन वर्षांपासून देहदान निम्म्यापेक्षा कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सलग दोन वर्षांपासून हा फटका बसत असल्याने आता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यास तसेच प्रयोगांवर प्रतिकुल परिणाम होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देहदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन घाटीच्या शरीररचनाशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुळातच देहदान करणाऱ्यांचे प्रमाण पूर्वीपासून फारच कमी आहे आणि देहदान करण्याची अजूनही फारशी मानसिकता नसल्याचे वारंवार समोर येते. त्यामुळे देहदानाविषयी जनजागृती केली जात असली तरी ती पुरेशी नसल्याचेही अप्रत्यक्षपणे स्पष्ट होत आहे. त्यातच करोनाचा इतर अनेक बाबींसह अवयवदान, नेत्रदान व देहदानावर अतिशय प्रतिकुल परिणाम झाला आहे. त्यातही अवयवदानासाठी ब्रेन डेड दात्याची गरज असते व इतर अनेक बाबी जुळवून आल्यानंतरच अवयवदान करता येते. त्या तुलनेत नेत्रदान व देहदान सहज करता येऊ शकते, तरीही दोन्हींचे दान निम्म्यापेक्षा जास्त घटले आले. त्याचवेळी देहदानाला तर आणखी जास्त फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनामुळे झालेले प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिकूल परिणामदेखील घटलेल्या देहदानाला कारणीभूत ठरले आहे. पुन्हा नेत्रदानासह देहदानासाठी मृत दाता हा करोना निगेटिव्ह असावा लागतो व या अटीमुळेही देहदानाला मर्यादा आल्याचे समोर आले आहे. या सर्व परिस्थितीत व अडचणींवर मात करुन एक जानेवारी ते पाच जुलैपर्यंत सहा दात्यांकडून देहदान झाले आहे, हेही काहीअंशी प्रेरणादायी म्हणावे लागेल. मात्र हे प्रमाण नेहमीच्या तुलनेत नक्कीच निम्म्यापेक्षाही कमी आहे आणि घाटीतील हजारांच्या घरातील एकूण सर्वस्तरीय विद्यार्थ्यांच्या तुलनेत झालेले देहदानाचे प्रमाण हे खूपच कमी असल्याचे जाणवल्याशिवाय राहात नाही.

देहदान

२०१७-२५

२०१८-२८

२०१९-१८

२०२०- ०८

२०२१- ०६ (आतापर्यंत)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com