Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedऐन दिवाळीत झेंडू महागणार; शंभरी पार असणार

ऐन दिवाळीत झेंडू महागणार; शंभरी पार असणार

औरंगाबाद – aurangabad

दसऱ्याला कमी आवक राहिल्याने ८० पार गेलेले झेंडूची फुले दिवाळीत शंभरी ओलांडणार असल्याचे चित्र आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीने यंदा फुलझाडांचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाड्यात (Marathwada) जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली असल्याने दिवाळीत बहुतांश पालेभाज्या देखील महागणार आहेत.

- Advertisement -

दिवाळी सण व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्या सणाला झेंड़ूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. पूजेसह घराला तोरण बांधणे, सजावट, वाहनांना; तसेच अन्य महत्त्वाच्या वस्तूंना झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात. त्यामुळे मागणी लक्षात घेता, विक्रीतून चांगली कमाई होईल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड केली, परंतु अतिवृष्टीमुळे फुलांचे मोठे नुकसान झाले आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांची नासाडी झाली. हाती आलेले सोयाबीनचे पीक ऐन कापणीच्या वेळी परतीच्या पावसाने हिरावून नेले आहे. कापूस, तूर, पिकांसह इतरही पिकांना मोठा फटका बसला आहे. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दरवर्षी जिल्ह्यातील वैजापूर, फुलंब्री, चौका; तसेच अन्य भागातून मोठ्या प्रमाणात आवक होत असते. माजलगाव, हिंगोली, बुलडाणा, परभणी, रिसोड, मंठा आदी भागांतूनही फुलांची मोठी आवक होते.

फुल शेतीपैकी सर्वाधिक झेंडूच्या फुलशेतीची लागवड केली जाते. जिल्ह्यात फुलशेतीचे मार्केट कुठेच उपलब्ध नसल्याने हैदराबाद, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू इतर राज्यांसह महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, औरंगाबादसह मुंबई ठिकाणच्या बाजारपेठेमध्ये जिल्ह्यातील झेंडूची फुले विक्रीसाठी दाखल होत असतात. मागच्या वर्षी करोनामुळे सर्वसण उत्सव आणि मंदिरे बंद असल्याने फुलशेतीला मागणी पाहिजे. त्या प्रमाणात नव्हती. मात्र, यावर्षी करोनाचा परतीचा प्रवास सुरू झाल्यामुळे मंदिर खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा झेंडूच्या फुलशेतीला मागणी वाढली आहे.

यावर्षी वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे झेंडूच्या फुलावर करपा सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे फुलशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे. फुले टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त औषध फवारणीदेखील करावी लागत आहे. त्याच बरोबर या करपा रोगामुळे उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळी उत्सवामध्ये झेंडूच्या फुलशेतीला मागणी वाढणार असून फुलांचे भाव देखील वधारण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या