Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमराठा आरक्षण : राज्य सरकारने प्रयत्न न केल्यास आंदोलन करू

मराठा आरक्षण : राज्य सरकारने प्रयत्न न केल्यास आंदोलन करू

पुणे |प्रतिनिधी| Pune

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळणे, ही दुर्दैवी बाब आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने न्यायालयात केलेले प्रयत्न अपुरे पडले आहेत.

- Advertisement -

राज्य सरकारने फेरयाचिका दाखल करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. राज्य सरकारने प्रयत्न न केल्यास आंदोलन करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यावर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे प्रतिक्रिया देताना म्हणाले, की मराठा क्रांती आरक्षणासाठी राज्य सरकारने न्यायालयात केलेले प्रयत्न अपुरे पडले आहेत.

राज्य सरकारने फेरयाचिका दाखल करावी, असे मत कोंढरे यांनी व्यक्त केले.मराठा आरक्षणाकरिता राज्य सरकारने प्रयत्न करावेतसंबंधित बातमी वाचा-मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती, प्रकरण घटनापीठाकडे वर्गते म्हणाले, की मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुणांच्या भविष्यात अंधकार निर्माण झाला आहे.

घटनापीठाची मागणी मान्य झाली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घटनात्मक दुरुस्ती करून दोन्ही आरक्षण संरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे जर झाले नाही तर, मराठा क्रांती मोर्चा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या