मराठा क्रांती मोर्चाने दिला ‘वर्षा’ समोर आंदोलनाचा इशारा

jalgaon-digital
3 Min Read

पुणे|प्रतिनिधी|Pune

मराठा आंदोलनातील ४२ आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ मार्गी लावावे नाहीतर वर्षा समोर आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चा ने दिला आहे.

बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि त्या प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ९ ऑगस्टला मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा आणि मातोश्रीसमोर उपोषणाला बसू त्यांना घराबाहेरही पडू देणार नाही. आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल,” अशी आक्रमक भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतली आहे.

मराठा ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चा चा वतीने २०१८ मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये ४२ बांधवांचे प्राण गेले. म्हणून त्या ४२ मराठा बांधवानच्या कुटुंबाना १०लाख रुपये आणि एक शासकीय नोकरी राज्य सरकारने द्यावे अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला.

ठाकरे सरकार समाजाची फसवणूक करत आहे, ते काही करत नाही, केवळ खोटे आश्वासन देऊन समाजाची दिशाभूल करत आहे. येत्या नऊ ऑगस्टला महाराष्ट्रात तील ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या घरासमोर सर्व मराठा बांधव ठिया आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला.

९ ऑगस्ट पर्यंत कुठलंही चर्चा न करता मराठा समाजाला न्याय देण्याचे काम सरकारने करावे आणि 15 हजार लोकांवर असलेले गुन्हे त्यांनी तात्काळ मागे घ्यावे अन्यथा महाविकास आघाडीला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं, “मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चाच्या ४२ बांधवांनी बलिदान दिले. या प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख आणि कुटुंबातील प्रत्येकी एकाला नोकरीचं आश्वासन दिले होतं. मात्र, या आश्वासनाची अजूनही पूर्तता झाली नाही. २०१८ मध्ये आझाद मैदानात प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, मराठा समाजाचा केवळ राजकारणासाठी वापर होत आहे.”

३० जुलैला बैठक घेण्याचं आश्वासन देण्यात आलं. मात्र आता कोणतीही बैठक, चर्चा न करता ४२ जणांना नोकरीवर घ्यावं, अशी आमची मागणी आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार गंभीर नाही. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ९ ऑगस्टला मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा आणि मातोश्रीसमोर उपोषणाला बसू त्यांना घराबाहेरही पडू देणार नाही.

आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल,” अशी आक्रमक भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतली आहे. मराठी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आता बैठक चर्चा नको, मागण्या मान्य करा, अशी थेट भूमिका घेती आहे. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना बैठकीला बोलावलं. मात्र आम्ही कोणीही या बैठकीला जाणार नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *