मलकापूर : नळगंगा नदी पात्रात जलक्रांती

मलकापूर : नळगंगा नदी पात्रात जलक्रांती

नगराध्यक्ष ॲड.हरीश रावळ यांचे योगदान

मलकापूर - Malkapur

शहरातुन जाणाऱ्या नळगंगा नदीपात्रात जुन्या जॅकवेल जवळ पोकलेन मशीनच्या साह्याने जलक्रांती करत नदी पात्राचे खोलीकरण स्वखर्चाने करून नगराध्यक्ष ॲड.रावळ यांनी परिसरातील लोकांच्या विहिरी, शासकीय विंधन विहिरींसह नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा म्हणून आज दि.12 जुन पासुन नदीपात्राचे खोलीकरण करण्यास सुरुवात केली आहे.

गत चार ते पाच वर्षापासून नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ पावसाळ्यापुर्वी नळगंगा नदीपात्रात ठिकठिकाणी स्वखर्चाने खोलीकरण करून नदीकाठच्या भागात जलक्रांती करीत असल्याने या भागातील खाजगी विहीरी, बोअर, शासकीय विंधनविहीरींनाही भर उन्हाळ्यात ही मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध असते, गतवर्षी केलेल्या नदीपात्रातील खोलीकरणामुळे जुन्या जॅकवेल जवळ आजही पाण्याचा साठा उपलब्ध आहे त्या ठिकाणी आणखी खोलीकरण केल्यास पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर होऊन नदीकाठच्या सर्व नगरातील खाजगी विहीरी, बोअरवेल, शासकीय विंधन विहिरींनाही मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध राहणार असल्याचे नगराध्यक्ष ॲड.हरीश रावळ यांनी सांगितले यावेळी न.प.गटनेते राजेंद्र वाडेकर, पाणीपुरवठा सभापती अनिल गांधी, पत्रकार गजानन ठोसर, विरसिंह दादा राजपुत, समाधान सुरवाडे, गौरव खरे, राजेश इंगळे, वासुदेव भोपळेंसह आदींची उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com