Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमहावितरण राज्यभर उभारणार सौर ऊर्जा प्रकल्प

महावितरण राज्यभर उभारणार सौर ऊर्जा प्रकल्प

औरंगाबाद – aurangabad

ग्रामीण भागातील (rural areas) गावठाण आणि कृषी वाहिन्यांचे एकत्रीकरण केल्यानंतर आता महावितरण त्या-त्या भागातील १५ हजार एकर जमिनीवर सुमारे ४ हजार मेगावॅट वीजनिर्मिती करणार असून यातून ३ हजार कृषी वाहिन्यांना वीज पुरविली जाणार आहे. या प्रकल्पासाठी १५ हजार एकर शेतजमिनीची आवश्‍यकता असल्याने महावितरण ही जमीन भाडेतत्त्वावर घेणार आहे. यासाठी प्रत्येक वर्षासाठी प्रतिहेक्टर ७५ हजार रुपये जमीनमालकाला भाडे दिले जाणार आहे. महावितरणच्या या योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी मिळणार आहे.

- Advertisement -

Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्रीVisual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम…

कृषिपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनेत कृषी अतिभारित उपकेंद्राच्या ५ किलोमीटरच्या परिघात २ ते १० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहेत. या कृषी वाहिन्यांवरील कृषी ग्राहकांना दिवसा ८ तास वीज देण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शेतजमीन भाडेतत्त्वावर घेण्यासाठी प्रक्रिया सुलभ असावी, यासाठी महावितरणने ऑनलाईन लॅण्ड पोर्टल सुरू केले आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील ३० टक्के कृषी वाहिन्या सौरऊर्जेवर आणण्याबाबतचे निश्‍चित करण्यात आले आहे. यासाठी ४ हजार मेगावॅट वीजनिर्मितीसाठी महावितरण शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेणार आहे. यासाठी २ हजार ५०० उपकेंद्रांमधील ४ हजार मेगावॅट क्षमतेच्या ३ हजार कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्याकरिता १५ हजार एकर जमिनीची आवश्यकता आहे. ही जमीन प्रतिहेक्टर ७५ हजार रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे भाडेतत्त्वावर घेतली जाणार असून, जमिनीचे भाडे दरवर्षी ३ टक्के वाढविले जाणार आहे.

जमीन तातडीने उपलब्ध व्हावी, याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी समिती गठित करण्यात आली असून या समितीमध्ये जिल्हाधिकारी, महावितरणच्या मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता, नगररचना विभागाचे सहायक संचालक व महाऊर्जा या विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.

Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम…

- Advertisment -

ताज्या बातम्या