करोना
करोना
अन्य

राज्यात आज 4878 करोना बाधित रुग्ण

Arvind Arkhade

मुंबई : दिवसेंदिवस राज्यात करोना रूग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासनच्या चिंता वाढल्या आहेत. तसेच आज राज्यात 4 हजार 878 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 1 लाख 74 हजार 761 इतकी झाली आहे. आज नवीन 1 हजार 951 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

आतापर्यंत एकूण 90 हजार 911 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 75 हजार 979 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 245 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com