Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या तरुणाची मुंबईत आत्महत्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या तरुणाची मुंबईत आत्महत्या

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन (Agitation) करत असलेल्या एका तरुणाने (Youth) मुंबईत (Mumbai) गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. सुनील कावळे (४५) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याने मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे...

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या तरुणाची मुंबईत आत्महत्या
IND vs BAN : विश्वचषक स्पर्धेत आज भारत-बांगलादेश भिडणार; कुणाचे पारडे जड?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा हा तरुण मुळाचा जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंबड तालुक्यातील (Ambad Taluka) असून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या (Mumbai) सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. तसेच त्याच्याकडे असलेल्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडल्याची माहिती समोर आली असून मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे आता मराठा आरक्षणासाठी या तरुणाने केलेल्या आत्महत्येमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या तरुणाची मुंबईत आत्महत्या
शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावरून भाजप नेते आक्रमक; म्हणाले,"सुप्रिया सुळेंना हमासकडून लढण्यासाठी पाठवा"

दरम्यान, या तरुणाच्या आत्महत्येनंतर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी आपल्या मागण्या (Demand) मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका, असे आवाहन केले आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे यासाठी लढा उभारला असून त्यांना राज्यभरातून चांगला पाठिंबा मिळत आहे. तसेच त्यांनी सरकारला आरक्षणावर विचार करून कृती करण्यासाठी दिलेली मुदत संपत आली आहे. त्यामुळे सरकार कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या तरुणाची मुंबईत आत्महत्या
Lalit Patil News : ललित पाटील प्रकरणात दोन महिलांना नाशिकमधून अटक; कोण आहेत या महिला?
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com