सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना धावपटूचा मृत्यू

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना धावपटूचा मृत्यू

सातारा | Satara

सातारा जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत एका धावपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज पटेल असे त्याचे नाव असून तो राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू होता. या घटनेने क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.

मॅरेथॉनदरम्यान धावताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला. स्पर्धेच्या स्वयंसेवकांनी त्याला तातडीने अँब्युलन्समध्ये ठेवले आणि हॉस्पिटलमध्ये नेले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून धावपटूचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com