अहमदनगर | Ahmednagar

राज्यातील वाढत्या करोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) १४ मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे.

परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये मोठी नाराजी आहे. ३ दिवस आधी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थी संतापले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाचं युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी निषेध केला आहे. त्यांनी म्हंटल आहे की, 'एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. करोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे?. ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे.' अशी मागणी त्यांनी केली आहे.
.MPSC ची पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर.
दरम्यान, एमपीएससीची परीक्षा रद्द केल्याच्या विरोधात एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालिकाश्रम रोड येथून मोर्चा काढण्यात आला असून दिल्लीगेट या ठिकाणी हा मोर्चा काढला आहे.

दरम्यान, या परीक्षेच्या तारखा गेल्या दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या MPSC च्या पूर्व परीक्षा करोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात त्या घेण्याचं ठरलं. उमेदवारांनी तयारी देखील सुरू केली. ११ ऑक्टोबर तारीख ठरली. पण मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबितच असल्यामुळे ती पुढे ढकलण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती. त्यासाठी आक्रमक भूमिका देखील घेतली होती. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर १ नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि २२ नोव्हेंबरला होणाऱ्या दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या.