डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे तरुणीने संपवली जीवनयात्रा

डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे तरुणीने संपवली जीवनयात्रा

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar

डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे एका तरुणीने घरातील सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल सावंगी परिसरात घडली...

प्रिया रमेश बुजडे असे या तरुणीचे नाव आहे. गेल्या 20 दिवसांपासून तरुणीचे डोके दुखत होते. तिच्यावर रुग्णालयात उपचारदेखील करण्यात आले. डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्याने प्रियाने घरातील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.

डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे तरुणीने संपवली जीवनयात्रा
आजचे दिनविशेष (दि. ०२ ऑगस्ट २०२३)

प्रियाच्या कुटुंबियांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी प्रियाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी प्रियाने एक चिठ्ठीदेखील लिहून ठेवली. आई-बाबा मला माफ करा मी चुकीचे करतेय, डोकेदुखी असह्य झाल्याने मी आत्महत्या करत आहे. असे तिने चिठ्ठीत नमुद केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे तरुणीने संपवली जीवनयात्रा
आजचे राशी भविष्य 2 ऑगस्ट 2023 Today's Horoscope

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com