धक्कादायक! डॉक्टरांवर रुग्णाकडून प्राणघातक हल्ला

धक्कादायक! डॉक्टरांवर रुग्णाकडून प्राणघातक हल्ला

यवतमाळ | Yavatmal

मागील काही महिन्यांपासून रुग्णांचा डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटनेत वाढ होतांना दिसत आहे. नुकताच यवतमाळमध्ये शासकीय रुग्णालयात दोन निवासी डॉक्टरांवर एका रुग्णाने चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धक्कादायक! डॉक्टरांवर रुग्णाकडून प्राणघातक हल्ला
महापालिकेत जोरदार राडा; आप आणि भाजपचे नगरसेवक भिडले, पाहा VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. प्रशिक्षणार्थी डॉक्टर जनरल वॉर्डात राऊंडवर होते. एका रुग्णाची तपासणी करत असताना बाजुला असलेल्या रुग्णाने डॉक्टरांवर हल्ला केला.

धक्कादायक! डॉक्टरांवर रुग्णाकडून प्राणघातक हल्ला
धक्कादायक! WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, अ‍ॅडमिनची थेट जीभचं कापली

हा हल्ला झाला त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितले की. संध्याकाळी वॉर्डमध्ये नॉर्मल सर्जरीचा राउंड सुरू होता. एका रुग्णाच्या प्रकृतीबाबत चर्चा करत असताना बाजूच्या रुग्णाने अचानकपणे डॉक्टरच्या गळ्यावर चाकून वार केला. त्यानंतर तेथे उभ्या असलेल्या दुसऱ्या डॉक्टरांनी रुग्णाचा हात पकडला यामुळे मोठा अनर्थ टळला. डॉक्टरांनी सुरक्षा रक्षकांना आवाज दिला. मात्र, तिथे कोणीही नव्हते.

धक्कादायक! डॉक्टरांवर रुग्णाकडून प्राणघातक हल्ला
प्रियकराचं प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य, लक्ष्य विचलीत करणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्यावर यवतमाळमधील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. याआधीदेखील डॉक्टर अशोक पाल यांची हत्या झाली होती. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com