
मुंबई | Mumbai
राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतलीय. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी नद्यांची पाणी पातळी घटली असून पूरही ओसरलाय.
परंतु पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Maharashtra Rain News)
विदर्भात आज-उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्याच्या काही भागातही पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे.
तर विदर्भातील वाशिम, अकोला, भंडारा, नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.