दुर्गम भागातील गावांना मुख्य रस्त्याने जोडणार- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

दुर्गम भागातील गावांना मुख्य रस्त्याने जोडणार- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

पालघर | प्रतिनिधी Palghar

पालघर जिल्ह्यातील (Palghar District ) काही भाग दुर्गम क्षेत्रात ( remote Places )येतो अशा भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत या मध्ये रस्ते व आवश्यक असेल तेथे पूल बांधणे गरजेचं असल्यामुळे त्या भागात या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून जिल्ह्यातील दुर्गम भाग मुख्य रस्त्याशी जोडण्यात येणार ( to connect remote villages with the main road )असल्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray )यांनी सांगितले.

वैतरणा नदीवरील ( Vaitarna River ) सावर्डे ते दापोरा गावांना जोडणाऱ्या लोखंडी पुलाचे ( Sarvarde to Dapora Bridge ) लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी तालुक्यातील आदिवासींचे कष्ट समजुन घेऊन सोडविल्याबद्दल पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले.

यावेळी कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण,आमदार रविंद्र फाटक,महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे,आमदार सुनिल भुसारा,जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे,

सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी सिह कार्यकारी,बांधकाम सभापती शितल धोडी,अभियंता माधवराव शंखपाळे,जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, तालुका प्रमुख अमोल पाटील,विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, सभापती आशा झुगरे,जिल्हा परिषद सदस्य सारीका निकम, जिल्हा परिषद सदस्य कुसूम झोले,जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख,डि वाय एस पी प्रशांत परदेशी,गटविकास अधिकारी संगीता भांगरे,पोलीस निरीक्षक संजय ब्राह्मणे,पोलीस उपनिरीक्षक संजय धुमाळ, गटशिक्षणाधिकारी वसंत महाले आदि उपस्थित होते. आदि आदी मान्यवर उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यातील बराचसा भाग हा दुर्गम असल्यामुळे दळण - वळणाचा मुख्य स्रोत रस्ते व पूल येथे उपलब्ध झाले नाहीत. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार अशा दुर्गम भागाना मुख्य रस्त्याने जोडले जाणार आहे. यामुळे या भागातील शेतकरी बांधव, व स्थानिक नागरिक यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे. असेही ठाकरे सांगितले..

Related Stories

No stories found.