पुणे | Pune

शहरात पुन्हा एकदा रानगवा वस्तीत आला आहे. पुण्यात पुन्हा गवा दिसल्याने भीती व्यक्त होत आहे. हा गवा पाषण

तलावाजवळ फिरताना दिसून आला आहे. दरम्यान, नागरिकांना महामार्ग आणि बावधन परीसरात गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी एक रानगवा पुण्यात दिसला होता. मात्र रेस्क्यू दरम्यान त्याला आपला जीव गमवावा लागला. मात्र आता पुन्हा एकदा पुण्यात कोथरूडमध्ये रानगव्याचे दर्शन झाले आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बावधन येथे हा गवा आढळून आला आहे. डोंगर आणि जंगल भाग जवळच असून तेथून हा गवा आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून गव्याला पकडण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. दरम्यान गेल्यावेळी गव्याला पकडताना झालेल्या चुका आणि बघ्यांची गर्दी टाळण्याचं मोठं आव्हान वनविभागासमोर आहे. याआधी ९ डिसेंबरला पुण्यात गवा दिसला होता.