चौदा वर्षीय मुलाच्या समोरच पत्नीचा डोक्यात पाटा घालून खून

चौदा वर्षीय मुलाच्या समोरच पत्नीचा डोक्यात पाटा घालून खून

पुणे |प्रतिनिधी| Pune

पिंपरी येथे आपल्या चौदा वर्षीय मुलाच्या समोरच पतीने पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून केला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. घटनेनंतर आरोपी पती हा स्वतः पिंपरी पोलीस ठाण्यात हजर झाला. साहेब मी पत्नीचा खून केला आहे अस म्हणत स्वतः समर्पण केलं आहे.

जेनब अजमुद्दीन चाकोरे अस खून झालेल्या महिलेचे नाव असून अजमुद्दीन अलाहुद्दीन चाकोरे अस आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकोरे कुटुंब हे मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. आरोपी अजमुद्दीन याला एक मुलगा आणि मुलगी आहे. काही कारणांमुळे मुलगी काही दिवसांपासून बालसुधारगृहात आहे. तिच्यावरून पती अजमुद्दिन आणि मयत पत्नी जेनब यांच्यात वाद सुरू होते. मुलीवरून दोघांमध्ये दररोज भांडण होत असत.

दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास चौदा वर्षीय मुलाच्या समोरच अजमुद्दीन याने पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून केला आहे. घटनेनंतर स्वतः तो पिंपरी पोलीस ठाण्यात हजर झाला. गुन्ह्याची कबुली देत पत्नीचा खून केला असल्याच त्याने पोलिसांना सांगितले. पिंपरी पोलिसांनी खात्री करून घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com