साईबाबा संस्थान विश्‍वस्त मंडळावर कुणाची वर्णी, आज फैसला

राज्य सरकार आज यादी सादर करणार
साईबाबा संस्थान विश्‍वस्त मंडळावर कुणाची वर्णी, आज फैसला

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

जागतिक किर्तीचे देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मंडळ नियुक्त करण्याची मुदत संपत आहे तरीसुद्धा सरकारकडून काल सोमवार अखेर नूतन विश्वस्त मंडळाची घोषणा न झाल्याने विश्वस्त मंडळाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याने विश्वस्त मंडळ नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे.दरम्यान, आज राज्य सरकारला विश्वस्त मंडळाची यादी न्यायालयाला सादर करावी लागणार आहे. विश्वस्त मंडळासह अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

साईबाबा संस्थान विश्‍वस्त मंडळावर कुणाची वर्णी, आज फैसला
साई संस्थान अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून सुरेशराव वाबळे यांच्या नावाची चर्चा

दरम्यान साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ न्यायालयाच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आले असून त्यानंतर संस्थानचा कारभार त्रिसदस्यीय तदर्थ समिती बघत आहे.यामध्ये प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त विभागीय आयुक्त,नासिक व सह धर्मादाय आयुक्त ,अहमदनगर यांची तदर्थ समिती धोरणात्मक व आर्थिक निर्णय उच्च न्यायालयाच्या परवानगीने घेत आहे.

सदर समिती ऑक्टोबर 2019 पासून साईबाबा संस्थानचा कारभार आजवर सांभाळत आहे. दरम्यान साईबाबा संस्थान, शिर्डीचे माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचीकेमध्ये याचिकाकर्ते यांच्यावतीने असा युक्तिवाद करण्यात आला होता की राज्य शासनाने 2 महिन्यांत विश्वस्त मंडळ नेमण्याची हमी दिली होती. मात्र सदर 2 महिन्यांंचा कालावधी केव्हाच संपला असून शासनाने आजवर विश्वस्त मंडळ नेमलेले नाही. त्यावर मागील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने शासनाला साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ नेमणुकी संदर्भात माहिती घेण्यासाठी 2 आठवड्याची मुदत वाढ देत योग्य माहिती न दिल्यास अवमानाची कारवाई करू असे तोंडी आदेश दिले होते.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाच्या वतीने विश्वस्त मंडळ नेमणुकीसंदर्भात हालचालींना वेग आला होता. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे विश्वस्त मंडळ येईल अशी अनेकांना आस लागून असल्याने बहुतांश इच्छुकांनी आपापल्या परीने फिल्डिंग लावली होती.मात्र घोषणा न झाल्याने त्यांचेही स्वप्न भंगूर होते की काय असा प्रश्न सर्वसामान्य साईभक्तांना पडला आहे. साईभक्तांसह शिर्डी ग्रामस्थांना विश्वस्त मंडळ कधी नियुक्त होते याची प्रतिक्षा आहे. लवकरच हि प्रतिक्षा साईबाबा पुर्ण करो हिच अपेक्षा शिर्डीकर पुन्हा एकदा व्यक्त करत असून त्यासाठी साईबाबांना साकडे घालत आहे.

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरच नियुक्त करावे. दोन वर्षापासून साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नसल्याने तदर्थ समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या समितीला मर्यादा असल्याने विकासकामांसाठी ,वेळोवेळी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. न्यायालयात विकासकामांबाबत निर्णय प्रलंबित असून शिर्डीसह परिसरातील चाळीस गावातील विकास रेंगाळला गेला आहे. यामध्ये प्रामुख्याने लेझर शो,गार्डन, संस्थानचे विविध प्रकल्प सुरू होण्यास विलंब होत आहे. शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पारदर्शी विश्वस्त मंडळात नियुक्त करतांना जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे.जेणेकरुन साईभक्तांच्या सेवासुविधा लक्षात घेऊन त्यादृष्टीने वाटचाल होईल आणी पर्यटनाला चालना मिळेल.

- रमेश गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

अध्यक्षपदासाठी ‘या’ नावांची चर्चा

साईबाबा संस्थान अध्यक्ष पदासाठी आमदार रोहित पवार, आमदार सुधीर तांबे, आमदार निलेश लंके, सुरेशराव वाबळे या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com