Viral Video : सेल्फीच्या नादात महिला कोसळली थेट पुराच्या पाण्यात अन् पुढे घडलं अस काही...

Viral Video : सेल्फीच्या नादात महिला कोसळली थेट पुराच्या पाण्यात अन् पुढे घडलं अस काही...

पालघर | Palghar

पावसाळा सुरु झाला असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळे निसर्ग खुलला असून पर्यटक (Tourist Spot) अनेक ठिकाणी फिरायला जात आहेत. पर्यटन स्थळे बहरली असली तरी तिथे पहायला जाणे ही एवढ्या पावसाळ्यात धोकादायक आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सुर्या नदीवर (Surya River) हा प्रकार घडला. तिथे उपस्थित असलेल्या काही व्यक्तींच्या तत्परतेमुळे या महिलेचा जीव (Lady fell Into Water) वाचला आहे.

अधिक माहितीनुसार, एक महिला डहाणू येथील वाघाडी येथे असलेल्या भीमबांध पर्यटन क्षेत्रावर आपल्या कुटुंबासहित आली होती. सुर्या नदीच्या पाण्यासोबत सेल्फी घेत असताना ती पाय घसरून नदीत कोसळली. हा प्रकार घडल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या दोघांनी पाण्यात उडी मारून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना या महिलेला वर काढण्यात अपयश आले. यानंतर पिंटू गहला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नदीत उड्या टाकत या महिलेला सुखरूप बाहेर काढले.

दरम्यान, पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी होत असून काही ठिकाणी पर्यटक सेल्फी आणि रील बनवण्याच्या नादात घसरून दुर्घटना होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पर्यटकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.पर्यटनस्थळी अशा घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात अशा घटना प्रकर्षाने घडतात. दरड कोसळणे, नदीला पूर, पाणी साचून जनजीवन विस्कळीत, अशा घटना पावसाळ्यात घडत असतात.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com