SSC Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, आजपासून मिळणार हॉलतिकीट

file photo
file photo

मुंबई | Mumbai

इयत्ता दहावीच्या परीक्षेला अवघा एक महिला उरला असून आजपासून विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेस २ मार्चपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी २० फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या हॉलतिकिटांचे वितरण विद्यार्थ्यांना शाळांमधून करण्यात येणार आहे.

शाळांच्या लॉगिनमध्ये ६ फेब्रुवारी रोजी हॉलतिकीट डाऊनलोड करून घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक www.mahahsscboard.in संकेतस्थळावर पाहू शकता, असे आवाहन करण्यात आले आहे.

हॉलतिकिटांची ऑनलाइन प्रिंट देताना शाळांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क विद्यार्थ्यांना आकारू नये. प्रिंटवर मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का असावा. हॉलतिकिटांमध्ये विषय व माध्यम यांच्यात बदल असल्यास त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात.

तसेच फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख आणि जन्मस्थळ यासंदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवावी, असेही मंडळाने म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com