कराडकर यांना अटक करून काय साधले?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला सवाल
कराडकर यांना अटक करून काय साधले?

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्य सरकारच्या आदेशाला न जुमानता पंढरपूरच्या दिशेने वारीला ( Pandharpur Wari ) पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर ( Bandatatya Karadkar ) यांना अटक करून राज्य सरकारने काय साधले? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांनी शनिवारी केला.

'वारी' (wari ) हा महाराष्ट्राच्या( Maharashtra ) संस्कृतीचा अविभाज्य घटक! विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय! श्रद्धा-परंपरांचे महत्त्व आहेच! बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधले? काहीच मध्यम मार्ग नव्हता? वारकर्‍यांचा असा अपमान? थेट अटकेची कारवाई ही सर्वथा चुकीची आहे! तीव्र निषेध! असे ट्विट फडणवीस यांनी आज कराडकर यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर केले.

करोना संकटामुळे राज्य सरकारने यंदा वारीवर निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधाला न जुमानता पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईवरून फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com