पुढील तीन दिवस राज्यावर पावसाचं संकट, कुठे मुसळधार, कुठे हलका पाऊस?, जाणून घ्या

पुढील तीन दिवस राज्यावर पावसाचं संकट, कुठे मुसळधार, कुठे हलका पाऊस?, जाणून घ्या

मुंबई | Mumbai

अरबी समुद्रात (Arabian Sea) कर्नाटकाच्या (Karnatak) किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट (Maharashtra Rain Alert) ओढविणार आहे. येत्या तीन दिवसात राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने (IMD) दिली आहे. (weather update)

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान राज्यातल्या विविध भागात मंगळवारी रात्री पावसानं हजेरी लावली. यावेळी कोकण, सातारा आणि पुण्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली. सातारा शहर परिसर, महाबळेश्वर, पाचगणी परिसरात रात्री एक पासून पहाटे तीन वाजेपर्यंत म्हणजेच बऱ्यापैकी दोन तास मेघगर्जनेसह पाऊस झाला. तर रत्नागिरी, खेड येथेही मुसळधार पावसानं हजेरी लावली. दापोली, मंडणगडमध्ये पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं. चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूरमध्ये पावसानं हजेरी लावली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com