Rain alert : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार; काय असणार परिस्थिती?, जाणून घ्या सविस्तर

Rain alert : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार; काय असणार परिस्थिती?, जाणून घ्या सविस्तर

मुंबई | Mumbai

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा (Rain) लपाछुपीचा खेळ चालू आहे. मध्येच आभाळ भरुन येतं तर काही काळासाठी ऊन पडतं. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) व्यक्त केला आहे. (Maharashtra Rain Forecast)

राज्यात उद्यापासून(२९ ऑगस्ट) मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुढील चार दिवस विदर्भ विदर्भ, मराठवाडा ,मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ३० ऑगस्टला विदर्भ आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Rain update)

भारतीय हवामान विभागानं (IMD) आजच्या दिवसासाठी सिंधुदुर्ग , बीड, उस्मानाबाद, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. तर २९ ऑगस्टला देखील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, यवतमाळ वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सोमवारी परभणी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर,रत्नागिरी, जळगाव, बुलडाणा, जालना, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मंगळवारी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. तर, १ सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे नेमकं काय?

ग्रीन अलर्ट : कोणतंही संकट नाही, सर्व काही ठीक आहे.

यलो अलर्ट : पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सुचना जारी करण्यात येते. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो.

ऑरेंज अलर्ट : कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.

रेड अलर्ट : नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्टला जारी करण्यात येते. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याताही असते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com