राज्यात २ दिवस तुफान बरसणार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात २ दिवस तुफान बरसणार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई | Mumbai

राज्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. गेल्या दहा वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस आणखी काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार १७ आणि १८ ऑक्टोबरला म्हणजे आज आणि उद्या मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Maharashtra Rainfall) पडण्याची शक्यता आहे.

तसेच हवामान विभागाने सोमवरी आणि मंगळवारी मुंबईला यलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. तसेच ठाणे, रायगड, पालघरसह राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com