Maharashtra Rain Update : राज्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती कशी राहणार?

IMD ने मांडला अंदाज
Maharashtra Rain Update : राज्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती कशी राहणार?

मुंबई | Mumbai

हवामान विभागाकडून (IMD) ऑगस्ट (August) आणि सप्टेंबर (September) दरम्यान पावसाचा अंदाज (Rain forecast) जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून यंदा प्रथमच पावसाळ्यात प्रत्येक महिन्यात हवामानाचा अंदाज जारी करण्यात येत आहे. हवामान विभागाचे मुख्य अधिकारी डॉ.महापात्रा यांनी (DGM IMD Dr Mrutyunjay Mohapatra) ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला.

भारतात ऑगस्ट आणि येत्या सप्टेंबर महिन्यात मॉन्सूनची (Monsoon) हजेरी ही काही भागात सामान्य तर काही ठिकाणी अतिवृ्ष्टी अशा स्वरूपाची असेल अशी माहिती हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आली आहे. या कालावधीत मॉन्सून हा ९५ टक्के ते १०५ टक्के असा सरासरी (LPA) स्वरूपात असणार आहे.

ऑगस्टमध्ये मॉन्सून ९४ टक्के ते १०६ टक्के असा सरासरी असणार आहे. आतापर्यंतच्या हवामान विभागाच्या मॉन्सूनच्या आकडेवारीनुसार १९६१ ते २०१० या कालवधीत मॉन्सूनचे प्रमाण हे २५८.१ मिमी इतके राहिले आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात मध्य भारतात सामान्य अशा स्वरूपाचा असणार आहे. तर देशाच्या अनेक भागात सामान्य आणि सरासरीपेक्षा सामान्य अशा स्वरूपाचा असेल असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

१ जून ते ३१ जुलैदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद

राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची १ जून ते ३१ जुलैदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. परंतु, मध्य महाराष्ट्राच्या नंदूरबार (Nandurbar) आणि धुळे (Dhule) येथे पावसाने ओढ दिली. धुळे येथे सरासरीपेक्षा २३ टक्के, तर नंदूरबार येथे ४३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. या उलट साताऱ्यात (Satara) सरासरीपेक्षा ७० टक्के, तर परभणीत (Parbhani) ७१ टक्के जास्त पाऊस नोंद झाली आहे. दरम्यान जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने दमदार एंट्री केली. कोकण (Kokan) आणि घाट भागावर अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या. कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara), कोकणात गेल्या दिवसांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com