आज आणि उद्या पावसाचा इशारा! 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा IMD चे ताजे अपडेट

आज आणि उद्या पावसाचा इशारा! 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा IMD चे ताजे अपडेट

मुंबई | Delhi

राज्यातील नागरिकांना गारठ्याचा सामना करावा लागत असताना आता पाऊसही बसरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

आज आणि उद्या पावसाचा इशारा! 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा IMD चे ताजे अपडेट
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

भारतीय हवामान विभागाचने राज्यात आज ( २८ डिसेंबर) आणि उद्या (२९ डिसेंबर) पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्यानं महाराष्ट्रात आज आणि उद्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD नं विदर्भातील काही जिल्ह्यांन ऑरेंज ॲलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो ॲलर्ट जारी केला आहे.

आज आणि उद्या पावसाचा इशारा! 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा IMD चे ताजे अपडेट
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

या' जिल्ह्यांना ॲलर्ट जारी

राज्यात आज (२८ डिसेंबर) औरंगाबाद, जालना आणि गोंदिया जिल्ह्याला यलो ॲलर्ट देण्यात आला आहे. तर, अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्याला ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. तसेच जळगाव, परभणी, हिंगोली, नाशिक, नांदेड, धुळे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.

तसेच उद्या (२९ डिसेंबर) नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. तर चंद्रपूरला यलो ॲलर्ट देण्यात आला आहे. नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना, औरंगबाद जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो.

आज आणि उद्या पावसाचा इशारा! 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा IMD चे ताजे अपडेट
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. विदर्भ, मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

आज आणि उद्या पावसाचा इशारा! 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा IMD चे ताजे अपडेट
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

शेतकऱ्यांना खबरदारीचे आवाहन

कृषी हवामान केंद्र आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना खबरदारीचे आवाहन केले आहे. शेळ्या व मेंढ्यांना मोकळ्या जागेत चरावयास टाळावे. परिपक्व अवस्थेतील पिकांची काढणी केली असल्यास पीक सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून ताडपत्रीने झाकून ठेवावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com