पुढील दोन दिवस पावसाचे; नगर, नाशिकसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट


पुढील दोन दिवस पावसाचे; नगर, नाशिकसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई | Mumbai

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील दोन दिवसात महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

पूर्व मध्य व पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

हवामान विभागाने पुणे, कोल्हापूर, नाशिकसह राज्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देेण्यात आला आहे.

मान्सून माघारी परतला असला तरी देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. आंध्र प्रदेशात पावसानं प्रचंड थैमान घातलं. आता महाराष्ट्रातही आज, उद्या मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त केलेला असून, राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे. यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com