महाराष्ट्रात पुढील दोन, तीन दिवसात 'या' ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

'या' जिल्ह्यांना हवामान खात्याकडून इशारा
महाराष्ट्रात पुढील दोन, तीन दिवसात 'या' ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

मुंबई | Mumbai

राज्यात (maharashtra) विविध कारणांनी सध्या हवामानात (weather update) सतत बदल होत असतात. आताही थंडीचा ऋतू असला तरी हवामानातील बदल काही थांबण्याचं नाव घेत नाही.

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं पुढील चार दिवसांसाठीचा हवामानाचा (weather alert) अंदाज जारी केला आहे. अरबी समुद्रातील (Arabian Sea) हवामानाच्या स्थितीमुळं पुढील दोन तीन दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

दक्षिण कोकण (Koakan), दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान काल ऐन दिवाळीत पुण्यात हलक्या सरी बरसल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com