सातारा -

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती हटविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी

येथे गुरुवारी (17 डिसेंबर) मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना सांगितले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीसाठी गुरुवारी ते सातार्यात आले होते. या बैठकीनंतर पवार यांची काही संघटना, संस्था प्रतिनिधींनी भेट घेतली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे. स्थगिती हटविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या सातारा जिल्हा समन्वयकांनी पवार यांच्याकडे केली.

त्यावेळी मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मी गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. परंतु वारंवार अडचणी येत आहेत असे त्यांनी समन्वयकांना सांगितले. दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचेही पवार यांनी नमूद केले.