खडकवासला धरण ओव्हरफ्लो; १६५०० क्युसेक्सने विसर्ग

Water released from Khadakwasla dam, as reservoir overflow
खडकवासला धरण
खडकवासला धरण
खडकवासला धरण
हतनुर धरणाचे २४ दरवाजे पूर्ण उघडले

पुणे

जून, जुलैमध्ये पाठ फिरवलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला असून पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणातून ११ हजार कुसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु होता. संध्यकाळी सात वाजता त्यामध्ये वाढ करून १६ हजार ५०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये सुरु होता. दरम्यान, नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

समाधानकारक पाऊस न पडल्याने पुणे शहराला पिण्यासह जिल्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात घट होत होती. मात्र, या आठवड्यात पावसाने शहरासह जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्यामुळे आता पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. त्यामुळे कोरोनारुग्णांची वाढती संख्या हि पुण्यासाठी काळजीची बाब असली तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने अंशतः दिलासा मिळाला आहे.

गेले काही दिवस धरणक्षेत्रात पावसाने सातत्याने हजेरी लावली असून पाणी पातळीत वाढ झाली आहे. काल (बुधवार) धरण १०० टक्के भरल्यानंतर या मौसमतील पहिला विसर्ग धरणाच्या गेट क्रमांक ६ मधून सुरु करण्यात आला होता. तो केवळ ४२८ क्युसेक्स होता.

आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे धारण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होते आहे. खडकवासला धरणातून संध्याकाळी सात वाजता १६ हजार ५०० विसर्ग सुरू होता. पावसाचा अंदाज घेऊन हा विसर्ग वाढू शकतो अशी माहिती देण्यात आली आहे. . त्यानुसार काल संध्याकाळपासून वाढलेला पावसाचा जोर बघता हा विसर्ग वाढवण्यात आला आहे. दरम्यान, नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तसेच महापालिकेचे आपत्ती विभाग देखील सज्ज ठेवण्यात आले आहे.

खडकवासला धरण साखळीतील एकूण पाणीसाठा व टक्के (१३ ऑगस्ट २०२० सकाळी ६.०० वाजेपर्यंत)

खडकवासला : १.९७ टीएमसी/१०० %

पानशेत : ७.९२ टीएमसी/७४.३७ %

वरसगाव : ७.७६ टीएमसी/६०.५० %

टेमघर : १.७६ टीएमसी/ ४७.४६ %

एकूण पाणीसाठा : १९.४१ टीएमसी/६६.५८ %

(गेल्या वर्षी आजच्या दिवशी : २९.१५ टीएमसी/१०० %)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com