पुढील ४८ तास धोक्याचे; कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

पुढील ४८ तास धोक्याचे; कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

मुंबई l Mumbai

जून महिन्यात दांडी मारलेल्या पावसाने (Maharashtra Rains Update) जुलै महिन्यात दमदार आगमन केलं. राज्यातीव विविध भागात जोरदार पाऊस बसत आहे. प्रचंड पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर (Flood) आला आहे. गावं, वस्त्या पाण्याखाली गेल्या आहे.

अशात हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात पावसानं कहर केल्यामुळे शाळांना अनेक जिल्ह्यांमध्ये सुट्टी देण्यात आली. पुणे जिल्ह्यातल्या शाळांना 3 दिवस सुटी देण्यात आलीय.

अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 17 तारखेपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. तर संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्हा, वसई विरार, नवी मुंबई, नांदेड आणि गडचिरोली जिल्ह्यातही शाळांना आज सुट्टी देण्यात आलीय.

दरम्यान मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे राज्यात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. काही धरणं, तलाव ओव्हरफ्लो झाली आहेत, तर काही ठिकाणी वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. धरणांतील पाणीसाठा वाढल्याने नक्कीच दिलासादायक गोष्ट म्हणावी लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com