हृदयद्रावक! रेल्वे रुळ ओलांडणं जीवावर बेतलं, पती पत्नीसह तीन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

हृदयद्रावक! रेल्वे रुळ ओलांडणं जीवावर बेतलं, पती पत्नीसह तीन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

मुंबई | Mumbai

रेल्वे रूळ ओलांडू नका, गाडी येत असेल तर प्लॅटफॉर्मवर लांब उभे राहा, कायम सतर्क राहा अशा सुचना वारंवार दिल्या जातात. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकानं रेल्वेतून प्रवास करताना अशा प्रकारच्या सुचना ऐकल्या असतील. मात्र तरी देखील काही मंडळी या सुचनांकडे दुर्लक्ष करतात आणि जीव गमावून बसतात.

अशीच हृदयद्रावक घटना लोकल ट्रेनच्या पश्चिम मार्गावर विरार रेल्वे स्थानकावर (Virar Railway Station) घडली. भरधाव मेल एक्स्प्रेसच्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिन्याच्या चिमुकल्याचा समावेश आहे. रेल्वे रुळ (Railway Track) ओलांडताना एक्स्प्रेसने धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात झाला.

हृदयद्रावक! रेल्वे रुळ ओलांडणं जीवावर बेतलं, पती पत्नीसह तीन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांचे लाखो रुपयांचे दागिने लुटले

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,रेल्वे रुळ ओलांडताना वेगात येणाऱ्या मेलने तिघांना जोरदार धडक दिली व महिला पुरुष आणि तीन महिण्याच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकांची ओळख अजून पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या रेल्वे अपघातात संपूर्ण कुटुंबच गेल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हृदयद्रावक! रेल्वे रुळ ओलांडणं जीवावर बेतलं, पती पत्नीसह तीन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
RRR च्या 'नाटू नाटू'ची गाड्यांनाही पडली भुरळ; अप्रतिम Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

मुंबईतील लोकल सेवेवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे प्रवाशांची संख्या दररोज वाढत असताना लोकल फेऱ्या मात्र मर्यादित आहे. तर अनेकदा वेळ वाचवण्याच्या हट्टापायी अनेकजण रेल्वे रुळ ओलांडून जातात. कित्येकदा तंबी देऊन देखील सुधारणा होत नाही. त्यामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागल्याच्या घटना यापूर्वी पाहायला मिळाल्या आहेत.

हृदयद्रावक! रेल्वे रुळ ओलांडणं जीवावर बेतलं, पती पत्नीसह तीन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
रस्त्यात बंद पडलेल्या गाडीला खा. विखेंचा ‘दे धक्का’; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com