'अमरावती बंद'ला हिंसक वळण

आंदोलकांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज!
'अमरावती बंद'ला हिंसक वळण

अमरावती | Amravati

त्रिपुरातील (Tripura) घटनेच्या निषेधार्थ काल मुस्लिम समुदायांनी (Muslim Community) अमरावतीत आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान काही दुकानांवर दगडफेक करून वाहनांची नासधूस करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती.

त्यानंतर भाजपने या घटनेचा निषेध म्हणून आज अमरावती बंदची हाक दिली होती. या बंदला हिंसक वळण लागलं. आक्रमक आंदोलकांनी या दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग आहे. हे तरुण जय श्रीरामच्या घोषणा देत आक्रमक झालेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com