करोना नियमांचे उल्लंघन : भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल

करोना नियमांचे उल्लंघन : भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल

पुणे (प्रतिनिधि) - आमदार आणि पिंपरी चिंचवडचे भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मुलीच्या मांडव टहाळीत कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन करून डान्स केल्याप्रकरणी आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार लांडगे हे आपल्या मुलीच्या मांडव टहाळीमध्ये डान्स करीत असल्याचा तसेच त्यावेळी मोठी गर्दी असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून नियम फक्त सर्वसामान्यांनाच लागू आहेत का? नेते मंडळींना सर्व काही माफ आहे का? असे विविध प्रश्न सर्वसामान्य जनतेत चर्चिले जात होते.

शेवटी आज भोसरी पोलीस ठाण्यात आमदार महेश लांडगे यांच्यासह एकूण ६० जणांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८८, २६९ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जमावबंदीचे उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

६ जून रोजी आमदार महेश लांडगे यांच्या मुलीचा विवाह सोहळा असून, त्यापूर्वी काल (रविवारी) झालेल्या मांडव सोहळ्यात त्यांनी कार्यकर्त्यांसह भंडारा उधळून डान्स केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तसेच, यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी मास्क देखील लावला नव्हता. कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तींनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाकडे दुर्लक्ष करत, गर्दी करत जल्लोष केला. तसेच, यावेळी वाजंत्री, बैल जोड्यांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com