विधानसभाध्यक्ष नाना पटोले कोरोनामुक्त

विधानसभाध्यक्ष नाना पटोले कोरोनामुक्त

मुंबई

: विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोनाच्या आजारावर मात करून आज नेहमीच्या उत्साहात विधानभवन,मुंबई येथील आपल्या कार्यालयात रुजू झाले

.पावसाळी अधिवेशना अगोदर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणीमध्ये आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी स्वत:चे विलगीकरण करून उपचार घेतले.

पावसाळी अधिवेशनाच्या तोडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थित हे अधिवेशन पार पडले.उपचारानंतर पटोले यांची कोरोना आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह) आल्यावर ते आज लोकसेवेच्या कार्यात नेहमीच्या जोमाने आणि उत्साहात पुन्हा रूजू झाले.आज त्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोलीतील महाविद्यालयास अनुदान उपलब्ध करून देण्यासंदर्भातील बैठक,विधानमंडळातील दैनदिन कामकाज तसेच मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. आपण लवकर बरे व्हावे यासाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com