ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन

मुंबई | Mumbai

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे (Shanta Tambe) यांचे आज सोमवार (दि.१९ जून) रोजी निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे (Passed Away) मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन
Bus Accident : ब्रेक फेल झाल्याने बसचा भीषण अपघात; १३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

आपल्या अभिनय कारकिर्दीत शांता तांबे यांनी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने आदी ख्यातनाम दिग्दर्शकांसोबत काम केले. मोहित्याची मंजुळा, सवाल माझा ऐका, मोलकरीण, मर्दानी, बाई मोठी भाग्याची अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने चित्रपटांमध्ये (Movies)काम करण्याचे ठरवले होते, असे त्या नेहमी सांगत असत.

ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान विभागाने दिली 'ही' महत्त्वाची माहिती

यासोबतच शांता तांबे यांनी दोन बायका फजिती ऐका, चांडाळ चौकडी, असला नवरा नको गं बाई, सोंगाड्या, चंदनाची चोळी या चित्रपटात देखील काम केले होते. तांबे यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख निर्माण केली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन
"२० जून हा दिवस..."; राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com