शिक्षक भरतीबाबत वर्षा गायकवाडांची मोठी घोषणा; म्हणाल्या...

शिक्षक भरतीबाबत वर्षा गायकवाडांची मोठी घोषणा; म्हणाल्या...
वर्षा गायकवाड

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून शिक्षक भरतीवरून (Teachers recruitment) अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. यावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात अनेकदा टोलेबाजीदेखील झाली. शिक्षक भरतीबाबत आता राज्य सरकारने (State Government) एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे...

ज्या ठिकाणी शिक्षकांची (Teachers) संख्या कमी आहे त्या भागात शिक्षक भरती (Teachers recruitment) केली जाणार आहे. ज्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक असतील तिथे त्यांचे समायोजन केले जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज सभागृहात दिली आहे. या प्रक्रियेला याच महिन्यात सुरुवात होणार आहे.

दरम्यान शिक्षक भरती अनेक दिवसांपासून रखडली होती. त्यामुळे अनेकदा शिक्षकांनी आंदोलन (Agitation) आणि मोर्चेही काढले होते. तरीदेखील राज्य सरकारने शिक्षक भरती विषय निर्णय न घेतल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. आता शिक्षक भरतीचा निर्णय झाल्यामुळे शिक्षकांमध्ये (Teachers) आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Related Stories

No stories found.