मुंबई -

करोना प्रतिबंधक लसीकरण पहिल्या दिवशी सुरळीत पडले पण अचानक को-विन अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी (17 जानेवारी)

होणारे लसीकरण रद्द करण्यात आले आहे. तसेच सोमवारीही लसीकरण होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाविरोधातील लसीकरणाची नोंदणी ठेवणारे को-विन हे अॅप डाऊन झाले आहे. तसेच लसीकरणाच्या ऑफलाइन नोंदणीस सध्या मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे या तांत्रिक बिघाडामुळे रविवारी आणि सोमवारी होणारी लसीकरणाची मोहीम रद्द करावी लागली आहे. तांत्रिक बिघाड दुरूस्त झाल्यास हे लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.