राज्यात लवकरच घरोघरी लसीकरण

ठाकरे सरकारची उच्च न्यायालयात माहिती
राज्यात लवकरच घरोघरी लसीकरण

मुंबई / Mumbai - महाराष्ट्रात लवकरच घरोघऱी लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती ठाकरे सरकारने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दिली आहे. पुण्यात (Pune) प्रायोगिक तत्वावर घरोघरी लसीकरणाची सुरुवात करण्यात येईल असेही राज्य सरकारने (maharashtra government) सांगितले आहे.

ज्येष्ठ नागरिक, अंथरुणाला खिळलेल्या आणि आजारी नागरिकांना घरोघरी जाऊन लस देण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. सुनवाणी दरम्यान ठाकरे सरकारने लसीकरणाबाबतची माहिती न्यायालयाला दिली. यासाठी केंद्र सरकारवर अवलंबून राहणार नसल्याचेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

राज्यात लवकरच घरोघरी लसीकरण
‘यामुळे’ ना.थोरातांच्या कन्येने गोपीचंद पडळकरांना शिकवले ‘संस्कार’, म्हणाल्या...

दरम्यान, घरोघरी लसीकरणाबाबत (vaccination at home) राज्य सरकारचा पाचकलमी कार्यक्रम तयार असताना केंद्र सरकराच्या मंजुरीची गरज काय, असा प्रश्‍न उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला विचारला होता. केरळ, बिहार, झारखंडने परवानगी घेतली होती का? अशी विचारणा करून अंतिम टप्प्यात माघार घेण्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तसंच बुधवारी नव्याने भूमिका स्पष्ट करण्याचेही आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने आज मुंबई हायकोर्टात आपण केंद्राच्या परवानगीची वाट पाहणार नसल्याचं सांगितलं आहे. केंद्राच्या परवानगीशिवाय घरोघऱी लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात करणार असल्याचेही राज्य सरकारने सांगितले आहे.

राज्यात लवकरच घरोघरी लसीकरण
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे?
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com