
मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद (Urfi Javed) चर्चेत आहे. उर्फी जावेद समोर आली, तर तिचे थोबाड फोडणार आहे. थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ. त्यानंतरही तिने नंगानाच सुरु ठेवला, तर तिचे थोबाड फोडणार, असे चित्रा वाघ यांनी म्हटले होते. आता उर्फीने ट्वीट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना पुन्हा डिवचले आहे.
उर्फीने एक फोटो ट्वीट केला आहे. त्यावर तिने चित्रा वाघ यांना टॅग करत लिहले आहे की, लेकिन अभी बोहोत सुधार बाकी है. सॉरी चित्रा वाघ जी. आय लव्ह यू. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये, मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू, असे तिने म्हटले आहे.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी तुळजापूरात बोलताना उर्फी जावेदवर टीका केली आहे. तुम्ही चार भितींच्या आतमध्ये काय करता, हा तुमचा प्रश्न आहे. पण, सार्वजनिक ठिकाणी आणि समाजात असल्यावर तुम्हाला कपड्यांचे भान असायला हवे पाहिजे. मुली जीन्स, टॉप्स, फ्रॉक घालतात.
त्या उघड्या-नागड्या फिरत नाहीत. ते कपडे आणि ही बाई नंगानाच करत आहे, याच्यात फरक आहे. फॅशन आणि नंगानाच याच्यामध्ये काही आहे का नाही?, असा सवाल चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी विचारला आहे.