लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला...; उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना सुनावले

लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला...; उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना सुनावले

मुंबई | Mumbai

उर्फी जावेदवर (Uorfi Javed) भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) भडकल्या होत्या. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) उर्फीला बेड्या ठोकण्याची मागणी केली होती. या प्रकरणावर आता उर्फी जावदने चित्रा वाघ यांना उत्तर दिले आहे...

उर्फीने ट्विट करत म्हटले आहे की, सध्याच्या राजकारण्यांना पाहून वाईट वाटते. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला टार्गेट केले जात आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष दिला जात आहे. समाजात आणखी काही मुद्दे आहेत, बेरोजगारी, लाखो बलात्काराच्या केसचे निकाल प्रलंबित आहेत त्याचे काय? असा सवाल उर्फी जावेदने केला आहे.

माझ्यावर टीका करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या महिलांना प्रत्यक्ष मदतीची गरज आहे त्यांना तुम्ही का मदत करत नाही. महिलांचे शिक्षण, लाखो बलात्काराची प्रलंबित प्रकरण यावर आपण का बोलत नाही? असेही तिने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com