मुंबईसह राज्यभरात अवकाळी सरी! पुढील ३ ते ४ तासांत जोर आणखी वाढणार

हवामान खात्याचा इशारा
मुंबईसह राज्यभरात अवकाळी सरी! पुढील ३ ते ४ तासांत जोर आणखी वाढणार

मुंबई | Mumbai

अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) राज्यात धुमाखूळ घातला आहे. ज्यामुळे उभ्या पिकांना तर फटका बसलाच आहे. पण, अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने काढणीला आलेली पिकेही जमीनदोस्त झाली आहेत.

आभाळच फाटलं तर ठिगळ लावायचे तरी कुठे असा उद्विग्न प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. आतार्यंत ग्रामीण भागात पडत असलेला अवकाळी पाऊस आता मुंबई (Mumbai Rain Update), ठाणे, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्येही पडू लागला आहे.

ठाण्यात आणि कल्याण डोंबिवलीत आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईसह (Mumbai Rain) पश्चिम आणि पूर्व उपनगरात पाऊस सुरू आहे. मुलुंड, विक्रोळी, अंधेरीत पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई उपनगर आणि आजुबाजूच्या परिसरात सकाळपासूनच हलक्या पावसाच्या सरी बरसायाला सुरुवात झाली आहे.

मुंबईसह राज्यभरात अवकाळी सरी! पुढील ३ ते ४ तासांत जोर आणखी वाढणार
भांडणं झाली... रिव्हाॅलवर काढलं... गोळीबार केला... ही काय मोगलाई आहे का? अजितदादा संतापले, पाहा VIDEO

मुंबई उपनगरातील अंधेरी, वर्सोवा, बोरिवली परिसरात रात्रीपासून अधुनमधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. सकापासूनच अधूनमधून पावसाच्या रिमझिम सरी कोसळू लागल्याने मॉर्निंगसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, पुढील तीन ते चार तासांत मुंबईत अवकाळी पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता सुद्धा हवामान खात्याने (Weather Alert) वर्तवली आहे.

मुंबईसह राज्यभरात अवकाळी सरी! पुढील ३ ते ४ तासांत जोर आणखी वाढणार
शौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून लॉज मालकासह तिघांना बेदम मारहाण

अवकाळी पावसाचा (unseasonal rain) शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरु आहेत. त्यामु्ळे पिकांना मोठा फटका बसणार असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे. आतापर्यंत राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (unseasonal rain) २५ जिल्ह्यातील एक लाख ३९ हजार हेक्टरवर शेती पिकांच नुकसान झाल्याची माहिती आहे.

राज्यात गेल्या आठवडाभरापासून झालेल्या गारपीठीमुळे देखील शेतीच अतोनात नुकसान झाले आहे. काढणीसाठी आलेली पिके पुर्णत खराब झाली आहेत. द्राक्षे, केळी,डाळींब, गहू, कापसाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे.

मुंबईसह राज्यभरात अवकाळी सरी! पुढील ३ ते ४ तासांत जोर आणखी वाढणार
PHOTO : बाबासाहेबांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का?

राज्यात पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसाची (unseasonal rain) शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान बदलामुळे शेती पिकांना फटका बसत आहे. तसेच अचानक झालेल्या या वातावरणातील बदलामुळे आरोग्यावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबईसह राज्यभरात अवकाळी सरी! पुढील ३ ते ४ तासांत जोर आणखी वाढणार
'त्या' ट्विटमुळं संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या; बार्शीत गुन्हा दाखल

दक्षिण कर्नाटकापासून मराठवाडा, पश्चिम विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तामिळनाडू ते छत्तीसगड पर्यंत विस्तारला आहे. त्यामुळे आज विदर्भाच्या काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उर्वरीत राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com